आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Raid On Social Worker Tista Setalwad House And Office

तिस्ता सेटलवाड यांच्या घर, कार्यालयावर धाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / मुंबई - सीबीआयने मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या मुंबईतील घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. एकूण चार ठिकाणांची झडती घेण्यात आली.
सीबीआय प्रवक्ता कंचन प्रसाद यांच्यानुसार, वॉरंट जारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तिस्ता, त्यांचे पती जावेद आनंद, सहकारी गुलाम मोहंमद पेशीमाम आणि सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिशिंग प्रा.लि.च्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. तिस्ता यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय विदेशांतून निधी प्राप्त केल्याचा आरोप आहे. सीबीआयने आठ जुलै रोजी याबाबत खटला दाखल केला होता. फाॅरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट(एफसीआरए - २०१० आणि १९७६) अंतर्गतही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. या कारवाईवर तिस्ता म्हणाल्या, आम्ही सीबीआयला एक पत्र लिहिले होते. त्यात म्हटले होते की, आमच्यावरील आरोपाच्या चौकशीत सहकार्य केले जाईल. असे असताना कारवाई करण्याची का आवश्यकता भासली हे समजत नाही.
गुजरात दंगल प्रकरण
तिस्ता सेटलवाड यांनी २००२ च्या गुजरात दंगल प्रकरण उचलून धरले होते. आपल्याविरुद्धच्या सीबीआय कारवाईला त्यांनी याकडे जोडून पाहिले आहे. त्यांनी सीबीआय केंद्र सरकारच्या पिंजऱ्यात बंद पोपट असल्याचे म्हटले आहे. आपल्याविरुद्धची कारवाई सूड भावनेतून केली असल्याचेही त्यांनी सांगितले.