आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Raided In Pune, Mumbai Against Hackers, Information Gave By America

पुणे, मुंबईत हॅकर्स विरोधात सीबीआयची धडक कारवाई,अमेरिकेकडून मिळाली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीआयने शुक्रवारी पुणे, मुंबई आणि गाझियाबाद येथे संगणक कंटकांवर (हॅकर्स) धाडी टाकल्या. अमेरिकेकडून मिळालेल्या माहितीनंतर भारत, चीन, रोमानियासह जगभरात ही कारवाई करण्यात आली. पुण्यात एका हॅकरला ताब्यात घेण्यात आले असून त्याने जगभरात 900 ई-मेल अकाउंटवर डल्ला मारला होता. त्याच्यासोबत उद्योग जगतातील काही लोकही सहभागी असल्याचे सांगण्यात येते.
अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयकडून सीबीआयला पुण्यातील अमित विक्रम तिवारी नामक तरुणाची माहिती मिळाली होती. हा तरुण एका लष्करी अधिका-याचा मुलगा आहे. अमितने फे ब्रुवारी 2011 ते 2013 या कालावधीत 900 ई-मेल अकाउंट हॅक केले. त्यामध्ये 171 भारतीय व्यक्ती होत्या. 30 वर्षीय अमित दोन वेबसाइट्स हायरहॅकर डॉट नेट व अ‍ॅनॉनिमिटी डॉट कॉमद्वारे आपल्या ग्राहकांचे काम करीत होता.दोन्ही वेबसाइट्सचे सर्व्हर अमेरिकेत आहेत. कुणाच्या ई-मेल अकाउंटमध्ये बेकायदा घुसखोरी करायची असल्यास त्या वेबसाइटवर पूर्ण माहिती दिली जात होती. एखाद्याच्या ई-मेल अकाउंटमध्ये घुसखोरी केल्यानंतर तो तत्काळ त्याची माहिती आपल्या ग्राहकांना देत होता. कामाचा मोबदला मिळाल्यानंतर तो आपल्या ग्राहकांना पासवर्ड देत असे. एका कामाचे तो साधारण 250 ते 500 डॉलर्स (सुमारे 15 ते 30 हजार रुपये) घेत होता. वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर व पेपालद्वारे त्याला ही रक्कम मिळत होती.