आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रमुक Vs यूपीए: सीबीआयच्या छापेमारीमागे सरकार नाही- पंतप्रधान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- द्रमुकचे प्रमुख एम करुनानिधी यांचा मुलगा एम स्टॅलिन यांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी सकाळी छापे टाकले. यामुळे डीएमके आणि यूपीएमधील संबंध आणखीच ताणले गेले आहेत.

सरकारमधून बाहेर पडण्याचा द्रमुकचा निर्णय आणि स्टॅलिन यांच्या घरावरील छापेमारीचा परस्परसंबंध लावला जात असून याचा आणि सरकारचा तीळमात्र संबंध नाही. स्टॅलिन यांच्या घरावर सीबीआयची धाड पडल्यामुळे सरकार नाराज झाले असल्याचेही मनमोहन सिंग यांनी सांगितले. स्टॅलिन यांच्यावर ही कारवाई का केली, याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही सीबीआयला देण्यात आले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारचा टेकू काढून घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच द्रमुक प्रमुख एम करुणानिधी यांना धक्का बसला. करुणानिधींचा मुलगा एमके स्टॅलिन यांच्या चेन्नई येथील घरावर सीबीआयच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी सकाळी छापे टाकले होते. स्टॅलिन यांनी परदेशी बनावटीची गाडीचा कर चुकवल्याचा आरोप आहे. ही गाडी ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे पथक स्टॅलिन यांच्या घरी धडकले होते.

परंतु सीबीआयच्या हाती काहीच लागले नाही. पण या कारवाईचा सुगावा मिळताच द्रमुक समर्थकांनी स्टॅलिन यांच्या घराबाहेर गर्दी केली.

दरम्यान, श्रीलंकेतील तामिळींच्या मुद्दय़ावर बुधवारी राजधानीत वातावरण तापलेले होते. द्रमुकच्या पाच मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. दरम्यान, सरकार द्रमुकच्या मागण्यांवर पुढे जात असताना अचानक त्यांनी पाठिंबा का काढून घेतला हे कळत नाही, असे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपनेही सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा इरादा नसल्याचे स्पष्ट केले.

द्रमुक मंत्र्यांनी दोन टप्प्यांत राजीनामे सुपूर्द केले. आधी एस.एस. पलनीमाणिक्कम, एस. जगतरक्षकन व एस. गांधी सेल्वन यांनी राजीनामे दिले. त्यानंतर तासाभराने एम.के. अझागिरी व नेपोलियन यांनी दिले. द्रमुकचे प्रमुख करुणानिधी यांचे पुत्र अझागिरी यांनी पंतप्रधानांची वेगळी भेट घेतली. हा त्यांचा बंडखोर पवित्रा मानला जात आहे. द्रमुकचा मित्रपक्ष व्हीसीकेनेही सरकारचा पाठिंबा काढून घेतला. पक्षाचे थिरुमा वलवन थोल एकटे खासदार आहेत.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे त्यांनी पाठिंबा मागे घेत असल्याचे पत्र दिले आहे.