आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Registered Case Against Dera Chief Ram Rahim

बाबा राम रहीम यांच्यावर 400 साधूंना नपुंसक केल्याचा आरोप, CBI ने केला गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सीबीआयला डेरा सच्चा सौदाचे संचालक गुरमीत राम रहीम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. राम रहीम यांच्यावर डेरामधील 400 साधूंना नपुंसक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण दिल्लीमध्ये नोंदवले गेले असून दिल्ली सीबीआय युनिटच या प्रकरणाचा तपास करणार आहे.

काय आहे प्रकरण?
हंसराज चौहाण या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सीबीआयला तपासाचे आदेश दिले आहे. चौहाणचा आरोप आहे, की बाबा राम रहीमने त्याला नंपुसक केले आहे. वैद्यकीय तपासणीत तो नंपुसक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, की बाबा राम रहीमच्या आश्रमात अनेक साधूंना नंपुसक करण्यात आले आहे. या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी हंसराज चौहाणने केली आहे. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने दिल्ली सीबीआय युनिटला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
चौहाणचे म्हणणे आहे, की आश्रमात राहात असलेल्या साधूंना इश्वर प्राप्तीचे स्वप्न दाखवण्यात आले होते. त्यांना सांगितले गेले, की नंपुसक झालेल्या साधूंनाच डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमसिंह इश्वराचा साक्षात्कार घडवतील. इश्वर प्राप्तीच्या आशेने डेर्‍यात राहाणार्‍या अनेक साधूंना ऑपरेशन करुन नंपुसक करण्यात आले.

याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे, की या घटनेनंतर त्यांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. हंसराज चौहाण 1990 मध्ये डेरा सच्चा सौदाशी जोडले गेले. 10 वर्षानंतर अर्थात 2000 मध्ये त्यांना नंपुसक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चौहाणचा दावा आहे, की त्यांच्यासोबत आणखी 20 जणांना नंपुसक केले गेले होते. ऑपरेशन करुन त्या सर्वांच्या शरीरात बदल करण्यात आला. चौहाणने तक्रार केली आहे, की ऑपरेशननंतर त्याला सगळे लोक नंपुसक म्हणून चिडवू लागले.

पुढील स्लाइडमध्ये, बाबांच्या चित्रपटाला पंजाबात विरोध...