आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळेबाजांनी 300 बँक खाती, 224 कंपन्यांचा केला वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामसह विविध राज्यांमधील हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालणार्‍या शारदा चिट फंड घोटाळ्याचा कट रचणार्‍यांनी 338 बँक खात्यांचा तसेच 224 कंपन्यांचा वापर केल्याचे उघड झाले आहे.

शारदा चिट फंड घोटाळ्याची आर्थिक गैरव्यवहार कायद्यानुसार चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या घोटाळ्याविषयीची माहिती जमा केली आहे. त्यात शारदा चिट फंड व तिच्या सिस्टर कंपन्यांनी केलेल्या संशयास्पद व्यावसायिक व्यवहारांचा समावेश आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा कट रचणार्‍यांनी ज्या 200 कंपन्यांचा वापर केल्याचे उघड झाले आहे, त्यापैकी 90 टक्क्यांहून जास्त कंपन्या तर फक्त कागदावर अस्तित्वात आहेत. 224 कंपन्यांपैकी फक्त 17 कंपन्यांनीच प्रत्यक्ष व्यवहार केला आहे, असे ईडीच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात 1,983.02 कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे.