आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राप्तिकरचे नऊ अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाच्या देशभरातील नऊ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात दिल्लीचे मुख्य प्राप्तिकर अधिकारी एस. के. मित्तल यांचा समावेश आहे. सीबीआयने दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि खम्मम येथील १७ ठिकाणी छापेही टाकले आहेत.

ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्यात मित्तल यांच्याव्यतिरिक्त बंगळुरूचे अतिरिक्त आयुक्त टी. एन. प्रकाश, चेन्नईचे उपायुक्त एस. मुरली, चेन्नईच्या आयुक्त विजयालक्ष्मी (चेन्नई), मुंबईचे अतिरिक्त आयुक्त एस. पांडियन, मुंबईतील आयुक्त जी. लक्ष्मी बाराप्रसाद, गाझियाबादचे अतिरिक्त महासंचालक विक्रम गौर आणि मुंबईचे अतिरिक्त संचालक राजेंद्रकुमार यांचा समावेश आहे. चार्टर्ड अकाउंटंट संजय भंडारी आणि त्यांच्या दोन मुलांवरही गुन्हा दाखल झाला आहे. भंडारींच्या क्लायंट्सना मदत करण्याच्या बदल्यात हे अधिकारी विमान प्रवास, हॉटेलमध्ये राहणे, प्रवास खर्चाची रक्कम मिळत असे, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...