आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Registers Fresh Case Against Kumar Mangalam Birla In Coal Allocation Scam

\'कोलगेट\'प्रकरणी कुमार मंगलम बिर्लांसह काही कंपन्‍याविरुद्ध सीबीआयकडून गुन्‍हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (मंगळवार) कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी आदित्‍य बिर्ला समुहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांच्‍यासह आणखी काही जणांविरुद्ध गुन्‍हे दाखल केले आहेत. सीबीआयने आज आणखी एक प्रथम तपासणी अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. नव्‍या एफआयआरमुळे उद्योग विश्‍वात खळबळ उडाली आहे.

सीबीआयने दाखल केलेल्‍या एफआयआरमध्‍ये नाल्को, हिंडाल्को आणि कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव पी. सी. पारेख यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध गैरव्यवहार व फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी हैदराबाद, कोलकाता, मुंबईसह काही ठिकाणी सीबीआयने छापे मारले असून चौकशी करण्‍यात येत आहे.

सीबीआयने 2005 मध्‍ये झालेल्‍या कोळसा खाणवाटपामध्‍ये नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी नवा एफआयआर दाखल केला आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्‍या आदित्‍य बिर्ला समुहाच्‍या हिंडाल्‍को या कंपनीला ओडीशातील तालाबिरा येथील दोन खाणींचे 10 नोव्‍हेंबर 2005 ला वाटप झाले होते. वीज निर्मितीसाठी या खाणीतून कोळसा काढण्‍यासाठी वाटप करण्‍यात आले होते.