आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेक्ट्रम घोटाळा : राजाकडून मनमोहनसिंगांची दिशाभूल, सीबीआयचा कोर्टात युक्तिवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी टूजी स्पेक्ट्रम वाटपाशी संबंधित धोरणात्मक प्रकरणांवर तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना चुकीची माहिती दिल्याचे सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयाला सांगितले. राजा यांनी सिंग यांची दिशाभूल करून अपात्र टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटप केले होते.

विशेष सरकारी वकील आनंद ग्रोव्हर म्हणाले, राजांनी टूजी परवान्यासाठी आरोपी कंपन्यांसाठी मुदतीचा अवधी वाढवला होता. राजांनी स्वान टेलिकॉम प्रा. लि.(एसटीपीएल) आणि युनिटेक वायरलेस (तामिळनाडू) लि. यासारख्या अयाेग्य कंपन्यांना स्पेक्ट्रम देण्याचा निर्णय घेतला होता. काही आरोपींच्या हितासाठी "प्रथम या, प्रथम मिळवा'(एफसीएफएस) धोरणात बदल केला आणि राजांनी तत्कालीन कायदामंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळला होता. कायदामंत्र्यांनी महत्त्वपूर्ण धोरणात्मक प्रकरणे मंत्र्यांच्या अधिकारप्राप्त गटाकडे पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. राजा यांच्या २ नोव्हेंबर २००७ रोजी तत्कालीन पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राचा हवाला देत ग्रोव्हर म्हणाले, वास्तवात राजांनी मनमोहनसिंग यांची दिशाभूल केली. दूरसंचार मंत्रालयात झालेल्या चर्चेवरून आरोपींच्या बाजूने जाणूनबुजून काम केल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ मे रोजी होणार आहे. या दिवशी अंतिम युक्तिवाद सुरू राहील.

काय आहे प्रकरण
- घोटाळा टूजी स्पेक्ट्रम वाटपाशी संबंधित आहे. यामध्ये राजा, द्रमुक खासदार कनिमोझी आणि काही वरिष्ठ कॉर्पोरेट अधिकाऱ्यासह १५ आरोपी आहेत.
- पुरावे नोंदवण्याची सुरुवात ११ नोव्हेंबर २०११ रोजी सुरू झाली होती. न्यायालयाने सीबीआयकडून दाखल दोन आरोपपत्रांत १७ विरुद्ध आरोप निश्चित केले होते.
- सीबीआयने आरोपपत्रात म्हटले होते की, टूजी स्पेक्ट्रमच्या १२२ परवाने वाटपात ३०,९८४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
- २ फेब्रुवारी २०१२ रोजी सर्व १२२ परवाने रद्द केले होते.

हे आहेत आरोपी
- राजा आणि कनिमोझी यांच्याशिवाय माजी दूरसंचारमंत्री सचिव सिद्धार्थ बेहुरा, राजाचे माजी खासगी सचिव आर. के. चंडोलिया, स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहिद उस्मान बलवा आणि विनोद गोयंका, युनिटेक लि.चे एमडी संजय चंद्रा, रिलायन्सच्या अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे तीन वरिष्ठ अधिकारी- गौतम दोशी, सुरेंद्र पिपारा आणि हरी नायर.
- कुसेगाव फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स प्रा.लि.चे संचालक आसिफ बलवा आणि राजीव अग्रवाल,कलईग्नार टीव्हीचे संचालक शरद कुमार आणि बॉलीवूडचे निर्माते करीम मोराणी आरोपी आहेत.
- या १४ जणांव्यतिरिक्त तीन कंपन्या आरोपी आहेत. स्वान टेलिकॉम प्रा.लि., रिलायन्स टेलिकॉम लि. आणि युनिटेक वायरलेस