Home »National »Delhi» CBI Team Visited Delhi Health Minister Satyendra Jains House

मनी लॉन्ड्रिंगच्या तपासासाठी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी पोहचली CBI, केंद्र सरकारवर 'आप'चा कट रचल्याचा आरोप

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 15:27 PM IST

  • सत्येंद्र जैन हे केजरीवाल यांचे निकटवर्तीय म्हणुन ओळखले जातात.
नवी दिल्ली- सीबीआय सोमवारी अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्येंद्र जैन य़ांच्या घरी पोहचली. सीबीआयने जैन यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सीबीआयने जैन यांच्या पत्नीची कसुन चौकशी केली. जैन यांची एप्रिल महिन्यात प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. त्यांच्यावर 4.63 लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. जैन हे केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळात आरोग्य मंत्री आहेत. ते कपिल मिश्रा यांच्या निशाण्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. 'आप'ने हा सरकारने रचलेला कट असल्याचा दावा केला आहे.

सिसोदिया यांच्या घरीही गेली होती CBI
- सीबीआयने जैन यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलवले होते. जैन यांच्या पत्नीने सीबीआयला आपल्या घरीच चौकशी करण्यास हरकत नसल्याचे सांगितले होते.
- आम आदमी पक्षाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, विरोधी पक्षांनी गप्प राहावे अशी सरकारची इच्छा आहे.
- जैन यांच्यावर 11.78 कोटीचा हवाल्याचाही आरोप आहे. 2010-12 दरम्यान बनावट कंपन्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इन्कम टॅक्स विभागाने बेनामी संपत्ती कायद्याच्या आधारे हे प्रकरण सीबीआयकडे पाठवले आहे.
- 16 जून रोजी सीबीआय उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी गेली होती. केजरीवाल सरकारच्या 'टॉक टू AK' कॅम्पेनमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपाची यावेळी चौकशी करण्यात आली.

Next Article

Recommended