आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिविरोधातील लुक आऊट नोटीसचे आमच्याकडे ठोस कारण: CBI ने SC ला सांगितले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पीटर मुखर्जीची कंपनी आयएनएक्स मीडियाला गैरमार्गाने फायदा मिळवून दिल्याचा आरोप असलेल्या कार्ति विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्याचे आमच्याकडे ठोस कारण असल्याचे सीबीआयने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सांगितले. तपास संस्थेने सुनावणी दरम्यान कार्तीच्या चौकशी दरम्यानची माहिती कोर्टासमोर सादर केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. कार्ति हा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचा मुलगा आहे. सीबीआयने कार्तिविरोधात लुक आऊट नोटीस जारी केले आहे. 
 
कार्तिच्या वकिलांचा युक्तिवाद... 
- सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याशिवाय जस्टिस ए.एम. खानविलकर आणि जस्टिस डी.वाय. चंद्रचूड यांच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत कोर्टाने लुक आऊट नोटीसवर काहीही वक्तव्य केले नाही. याचा अर्थ असा घेतला जात आहे की सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवया कार्तिला आता देशाबाहेर जाता येणार नाही. 
- सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात कार्तिला आदेश दिले होते की त्याने आयएनएक्स मीडिया केसमध्ये सीबीआयच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. कार्ति या चौकशीपासून दूर पळत होता. त्याने सीबीआय आणि ईडीच्या अनेक समन्सला उत्तर दिले नव्हते, किंवा चौकशीलाही सामोरा गेला नाही. 
- त्यानंतर सीबीआयने त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केले होते. त्याला कार्तिने मद्रास हायकोर्टात आव्हान दिले होते. तिथे त्याला या प्रकरणी दिलासा मिळाला होता. मात्र, सीबीआयने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.
- सुप्रीम कोर्टाने कार्तिला तपास संस्थांच्या चौकशीला सामोरे जाण्याचा आदेश दिला. 
- 23 आणि 28 ऑगस्ट रोजी तो सीबीआय समोर हजर झाला. या दोन्ही तारखांना त्याला जवळपास 14 प्रश्न विचारण्यात आले. 
 
ही सामान्य केस नाही 
- सुनावणी दरम्यान अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी कोर्टाला सांगितले, की लुक आऊट नोटीस जारी करण्याचे आमच्याकडे ठोस कारण आहे. हे काही एका कंपनीशी संबंधीत साधारण प्रकरण नाही. यात अकाऊंटस आणि विदेशातील संपत्तीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आलेला आहे. 
- कार्तिचे वकील गोपाल सुब्रम्हण्यम म्हणाले, 'तपासाचा विषय माझे आशिल नाही तर त्याचे पिता आहेत. ते केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यांनी परकीय गुंतवणुकीअंतर्गत एका कंपनीनाल 2007 मध्ये मंजूरी दिली होती.'
- सुब्रम्हण्यम यांनी असेही म्हटले की या प्रकरणात तत्कालिन सचिव दर्जाच्या एकाही  अधिकाऱ्याची चौकशी झालेली नाही. 
 
काय आहे आरोप?
- कार्तिचे वडील पी. चिदंबरम यूपीए सरकारमध्ये आधी गृह आणि नंतर अर्थमंत्री होते. 
- सीबीआयचा आरोप आहे की एका कंपनीवर अप्रत्यक्षरित्या कार्तिचे नियंत्रण होते, त्याला इंद्राणी आणि पीटर मुखर्जीच्या मीडिया हाऊसमधून (आयएनएक्स) फंड ट्रान्सफर झाला होता. कार्तिशिवाय आणखी चार जणांना या प्रकरणात समन्स बजावण्यात आले होते. 
- आरोप आहे की कार्तिने आपल्या प्रभावाचा गैरवापर करुन आयएनएक्सला थेट परकीय गुंतवणुकीची परवानगी मिळवून देण्यासाठी मदत केली. याप्रकरणी त्याच्या घर आणि कार्यालयावर काही महिन्यांपूर्वी छापे पडले होते. 
- केंद्र सरकार बदल्याच्या भावनेने कारवाई करत असल्याचा आरोप कार्तिने केला होता. 
बातम्या आणखी आहेत...