आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Word Respected On International Level, Interpol Preses

सीबीआयच्या शब्दाला जागतिक स्तरावर मान, इंटरपोलने केले तोंडभरून कौतुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाची मुख्य तपास संस्था केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) इंटरपोलने कौतुक केले आहे. सीबीआय शक्तिमान असून आंतरराष्‍ट्रीय स्तरावर त्यांच्या शब्दाला मान आहे, असे इंटरपोलने म्हटले आहे.
सीबीआयच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त इंटरपोलचे सरचिटणीस रॉबर्ट के. नोबल यांनी सीबीआयच्या कामाची स्तुती केली.

इंटरपोलसाठी नॅशनल सेंट्रल ब्युरो म्हणून काम करताना सीबीआयने आंतरराष्‍ट्रीय संघटित गुन्हेगारीविरुद्धच्या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे म्हटले आहे. इंटरपोलसोबत काम करत असताना सीबीआयने अनेक वेळा नेतृत्वगुण दाखवले आहेत. त्यामुळे सीबीआय शक्तिमान झाले असून या संस्थेच्या शब्दास आंतरराष्‍ट्रीय स्तरावर मान प्राप्त झाल्याचे नोबल म्हणाले. गेल्या पाच दशकांत सीबीआयने इंटरपोलसोबत महत्त्वाचे योगदान दिल्याचे ते म्हणाले.