आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्टा वेस्टलँड, मल्ल्याप्रकरणी सीबीआयची एसआयटी स्थापन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा आणि परागंदा उद्योगपती विजय मल्ल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुजरात केडरच्या आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली.
१९८४ च्या बॅचचे आयपीएस, अतिरिक्त संचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. २००२ मध्ये गाेध्रा जळीतकांड प्रकरणात अस्थाना यांच्याच नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती. त्यांनी चारा घोटाळ्याच्या तपासातही योगदान दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटी व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा आणि मल्ल्या प्रकरणाचा तपास करेल.
फिनमेकानिका आणि ऑगस्टा वेस्टलँडच्या प्रमुखांना इटलीच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तपासाची दिशा बदलली आहे. काही भारतीयांना लाच दिल्यानंतर ३६०० कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर झाल्याचा आरोप आहे. ब्रिटनस्थित ऑगस्टालँडने लाच दिल्याचे मिलान अपिलीय न्यायालयाने स्पष्ट केले आहे. फिनमेक्कानिकाची ऑगस्टा वेस्टलँड सहकारी कंपनी आहे. एसआयटी आपल्या तपासात लाचेचे लाभार्थी शोधून काढणार आहे. यासंदर्भात
पाठवण्यात आलेल्या लेटर्स रोगेटारीच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने घेतलेल्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज अन्यत्र वळवल्या प्रकरणाचीही एसआयटी चौकशी करणार आहे.
पुढे वाचा... वीरभद्र यांची घेतली झाडाझडती; मुख्यालयात हजर
बातम्या आणखी आहेत...