आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसईकडून 11 वीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात बदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई) अकरावीच्या व्यावहारिक इंग्रजी अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजीचा सुधारित अभ्यासक्रम लागू होईल. बारावीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात बदल करण्याची प्रक्रिया सुरू असून तो पुढील शैक्षणिक वर्षात (2014-15) लागू होणार आहे. सीबीएसईच्या संचालक डॉ. साधना पराशर यांनी ही माहिती दिली. आर्थिक धोरणांमुळे होणारे बदल, महागाई व मंदी लक्षात घेता ज्ञानवृद्धीसाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यानुसार आता अकरावीसाठी व्यावहारिक आणि साहित्य अशी दोन पुस्तके असतील.

नवी पुस्तके तयार करण्याचा उद्देश
> इंग्रजी लिहिणे - बोलणे यासोबत व्यावसायिक व शैक्षणिक उपयोगाची शैली विकसित करणे
> पर्यावरण, सुरक्षा, आरोग्य, श्रमाचे महत्त्व, माध्यमांची भूमिका याबाबत भान विकसित करणे
> जागतिक पातळीवर रोजगारासाठी आवश्यक इंग्रजीची उपयुक्तता लक्षात घेणे
> विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे व भाषेतून त्यांचा आधार मजबूत करणे
> विद्यार्थी व शिक्षकांमधील उत्तम संवाद कायम ठेवण्यासाठी
त्यांनी सहजतेने इंग्रजीतूनच चर्चा करावी यासाठी.