आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBSE: 12 वीत कला शाखेची रक्षा देशात अव्वल; 87.50 % मुली तर 78% मुले उत्तीर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्षा गोपाल नोएडातील एमिटी इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थीनी आहे. - Divya Marathi
रक्षा गोपाल नोएडातील एमिटी इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थीनी आहे.
नवी दिल्ली - सीबीएसईने रविवारी १२वी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात एकूण ८२% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हा निकाल १ % कमी आहे. नोएडातील अमायटी इंटरनॅशनल स्कूलच्या कला शाखेतील विद्यार्थिनी रक्षा गोयलने (९९.६%) अव्वल स्थान पटकावले असून चंदिगडची भूमी सावंत (९९.४%) दुसऱ्या तर चंदिगडच्याच आदित्य जैन व मन्नत लुथरा यांनी तिसरे स्थान पटकावले.
 
अव्वल क्रमांकांत जसे मुलींचे वर्चस्व राहिले, तसेच एकूण निकालातही मुलींनीच बाजी मारली. एकूण ८७.५०% मुली उत्तीर्ण झाल्या. तर, ७८% मुले उत्तीर्ण झाले आहेत.

कट ऑफ अधिक उंचीवर जात असल्याने त्यावर अंकुश लावण्याच्या दृष्टीने सीबीएसईने यंदा कठीण प्रश्नांना ग्रेस मार्क देणारे मॉडरेशन धोरण थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे धोरण यंदा पुन्हा राबवण्यात आले.
 
औरंगाबादेतून ९७.६% गुण मिळवून वैष्णवी सिकची प्रथम
औरंगाबाद शहरातून स्टेपिंग स्टोन स्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी सिकचीने ९७.६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला, तर तन्वी वेलंगीने ९७.४ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. औरंगाबादमधून सुमारे अडीचशे विद्यार्थी सीबीएसई बारावीच्या परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरातील सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला अाहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, रक्षाचे गुणपत्रक आणि विषयनिहाय १००% गुण... 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...