आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CBSE XII Result: दिल्लीच्या गायत्रीने मिळवले 500 पैकी 496 गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीबीएसई 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आनंद साजरा करताना विद्यार्थीनींनी सेल्फी घेतली - Divya Marathi
सीबीएसई 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आनंद साजरा करताना विद्यार्थीनींनी सेल्फी घेतली
नवी दिल्ली - सीबीएससीच्या 12 वीच्या परीक्षेत यंदा विद्यार्थींनींनी बाजी मारली आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता परीक्षेचा निकाल जाहीर झाला. देशभरातील सर्व विभागांचा एकाच वेळी निकाल जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीच्या साकेत येथील न्यू ग्रीनफील्ड शाळेची एम.गायत्री हिने 500 पैकी 496 गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला आहे. तिच्या गुणांची टक्केवारी 99.2 आहे. नोएडाच्या मैथिली मिश्रा हिला 99% गुण मिळाले आहेत. डोळ्याने पाहू शकत नसलेल्या दिल्लीच्या आरकेपुरम येथील तपस भारद्वाजने 90 टक्के गुण मिळवले आहेत. 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होणार आहे.

मुलीच अव्वल
एकूण 82% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 87% मुली आणि 77% मुले आहेत. तिरुअनंतपुरम येथील निकाल सर्वांत चांगला आहे. या विभागाचा 95.4% निकाल लागला आहे. मात्र, आग्रा येथे एका विद्यार्थीनीने निकाल पाहाताच पुलावरुन यमुनेत उडी घेतली. तिथे पोहोत असलेल्या मुलांनी तिला वाचवले आहे. शाळेत टॉपर असलेल्या या विद्यार्थीनीला 60% गुण मिळाले यामुळे ती निराश झाली होती.

मोदींनी ट्विटरवर दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे, की सीबीएसई 12 वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या माझ्या सगळ्या युवक मित्रांना शुभेच्छा. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो.

कुठे पाहायचा निकाल
सीबीएसईचा निकाल पाहाण्यासाठी अधिकृत वेबसाइट शिवाय http://results.bhaskar.com येथेही निकाल पाहाता येत आहेत. यंदा 12 वीच्या परीक्षेला 10,40,368 विद्यार्थी बसले होते. त्यात 6,07,383 मुले आणि 4,32,985 मुली होत्या.

पालक आणि विद्यार्थ्यांनी समुपदेशनासाठी 1800 11 8004 या क्रमांकावर फोन करावा.
निकालानंतर पुढे काय ?
सीबीएसई 12 वीच्या निकालानंतर जेईई-मेनची कॉमन मेरिट लिस्ट आणि आयआयटीच्या प्रवेशाचे चित्र स्पष्ट होईल. मेनी कॉमन मेरिट लिस्ट 7 जुलै आणि अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल 18 जूनला लागण्याची शक्यता आहे. मेनच्या मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँकिंग मिळेल. त्याआधारावर त्यांना एनआयटी, ट्रिपल आयटी आणि इतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल. यात बोर्डचे 40% गुण आणि मेन्सचे 60% गुण ग्राह्य धरले जातील.

पुढील स्लाइडवर पाहा, गायत्रीचा निकाल
बातम्या आणखी आहेत...