आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई 12वी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी, 2 जूनला 10वीच्या निकालाची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशन (सीबीएसई)च्या वतीने मार्च-एप्रिल 2017 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी सीबीएसई बोर्ड परीक्षांचे निकाल रविवारी अर्थात 28 मे रोजी जाहीर होणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याची माहिती दिली आहे. यासोबतच बोर्डाने मॉडरेशन पॉलिसीबाबत दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन करणार असल्याचेही म्हटले आहे. विद्यार्थी निकाल सीबीएसई बोर्डाच्या cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील.
 
सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल 25 मे रोजी घोषित होणार होता. मात्र काही कारणांमुळे त्याला उशिर झाला. तसेच, 2 जून रोजी सीबीएसईच्या 10 च्या परीक्षांचे निकाल घोषित होण्याची शक्यता आहे.
 
निकाल घोषित होण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. निकाल लांबला असला तरी निकालाबाबतच्या तारखेची घोषणा लवकरच केली जाईल असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले होते. 
 
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कसा पाहाता येईल निकाल... 
बातम्या आणखी आहेत...