आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांमध्ये CCTV आवश्यक, कर्मचाऱ्यांचे केले जावे पोलिस व्हेरिफिकेशन : CBSCची गाइडलाइन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायन शाळेत शुक्रवारी (8 सप्टेंबर) 7 वर्षांच्या मुलाची हत्या झाली होती. - Divya Marathi
रायन शाळेत शुक्रवारी (8 सप्टेंबर) 7 वर्षांच्या मुलाची हत्या झाली होती.
नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशनने (सीबीएसई) मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. आदेशात म्हटले आहे की सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला जाणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन केले पाहिजे आणि शाळेत बाहेरुन येणाऱ्या लोकांच्या प्रवेशाला आळा घातला पाहिजे. गुडगावमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी (8 सप्टेंबर) 7 वर्षांच्या मुलाचा खून झाला होता. त्यानंतर शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. 
 
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
हरियाणातील गुडगाव आणि दिल्लीतील गांधी परिसरातील शाळेतील मुलाचा मर्डर झाला होता. एकाच आठवड्यात दोन बालकांच्या हत्या झाल्याने शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वेत्र विचारला जात होता. गुडगाव प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर, दिल्लीतील घटनेत आरोपी शिपाई विकासला (40) अटक करण्यात आली आहे. 
 
सुरक्षेवरुन पालक संतप्त 
-गुडगावमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाळेच्या बस कंडक्टरनेच मुलाचा गळा चिरुन हत्या केल्याने पालकांनी शाळेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होता. आठ तास मुलांना कोणाच्या भरवशावर शाळेत पाठवायचे असा सवाल पालकांनी केला होता. 
- पालकांनी बरेच दिवस शाळेबाहेर आंदोलन केले. शाळेची किरकोळ तोडफोड केली. 
 
नॉन टिचिंग स्टाफमध्ये महिला पाहिजे - मंत्री 
- केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी गुडगावमधील घटनेनंतर शाळेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची भरती करण्याची मागणी केली आहे. 
- महिला आणि बालकल्याण मंत्री गांधी म्हणाल्या शाळेच्या बसवरील ड्रायव्हर - कंडक्टर सोडल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये फक्त महिला पाहिजे. यामुळे शाळांमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाला आळा घालता येईल. 
 
मनुष्यबळ विकासमंत्री काय म्हणाले 
- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, शाळांमध्ये महिला स्टाफ जास्तीत जास्त असला पाहिजे. याशिवाय महिलांनाच चालक आणि वाहक प्रशिक्षण दिले गेले तर मुलांची सुरक्षा अधिक खात्रीशीर मानली जाऊ शकते. 
- मुलांच्या सुरक्षेवर शाळा आणि पालकांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे, कारण मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. 
बातम्या आणखी आहेत...