आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBSE Issues Notice To Ryan International And Said Child Death Could Have Been Averted

शाळेने गंभीरपणे कर्तव्याचे पालन केले असते, तर प्रद्युम्न बचावला असता: सीबीएसई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रद्युम्न हत्याकांड प्रकरणात सीबीएसईने गुरगावच्या रेयान इंटरनॅशनल शाळेची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावली आहे. शाळेने गंभीरपणे कर्तव्याचे पालन केले असते, तर  प्रद्युम्न बचावला असता, असे सीबीएसईने म्हटले आहे.   विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीबीएसई दरवर्षी  मार्गदर्शक तत्त्वे जारी करते.  मात्र, या प्राथमिक उपाययोजना करण्यात शाळेला अपयश आले. संपूर्ण घटनाक्रम पाहता, शाळेचा अक्षम्य निष्काळजीपणा यास कारणीभूत आहे. शाळेच्या व्यवस्थापनाकडून या नोटिशीला १५ दिवसांत उत्तर द्यायचे आहे. सीबीएसईच्या दोन सदस्यांच्या वस्तुस्थितीची पडताळणी करणाऱ्या समितीने शाळेला भेट दिली. यावर शुक्रवारी अहवाल सादर करण्यात आला हाेता.  

पोलिस आरोपपत्राऐवजी अंतिम अहवाल सादर करणार
गुरगाव पोलिस प्रद्युम्न हत्याकांडाच्या तपासाचा अहवाल सादर करणार आहे. सीबीआय चौकशीचे आदेश निघाल्यानंतर पोलिस आरोपपत्र सादर करणार नाहीत. पोलिस आयुक्त संदीप खिरवार यांनी सांगितले, चौकशी पूर्ण होत आलेली आहे. सोमवारपर्यंत गृह मंत्रालय सीबीआय चौकशीचे आदेश जारी करेल.
 
सीबीएसईने म्हटले शाळेने मुलांच्या सुरक्षेची अशा प्रकारे केली हेळसांड  
- शाळेत ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लीनर्ससाठी वेगळी शौचालये नव्हती. ते विद्यार्थ्यांच्या शौचालयात जात होते.  
-  शाळेत सीसीटीव्ही खूप कमी प्रमाणात होते. जे हाेते तेही काम करत नव्हते. काही ठिकाणी भिंतीऐवजी  कामचलाऊ काटेरी कुंपण वापरात आणले.  
-  हत्येनंतर गुन्हा दाखल करण्यास आणि शिक्षणाधिकारी व सीबीएसईला माहिती कळवण्यात शाळा व्यवस्थापन अपयशी ठरले.  
-  पाच मजली इमारतीत तीन मजल्यांवर वर्ग चालू होते. रिकाम्या वर्गांना कुलपे लावण्यात आलेली नव्हती. विद्यार्थी तेथे येत-जात होते.   
बातम्या आणखी आहेत...