आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई गणिताच्या विद्यार्थ्यांना दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीएसई १२ वीच्या परीक्षेतील गणिताच्या कठीण प्रश्नपत्रिकेमुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी थोडा दिलासा मिळाला. लोकसभेत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, गणिताच्या प्रश्नपत्रिकेची चौकशी व्हायला हवी. मी या प्रकरणी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना माहिती देईन. दरम्यान, सीबीएसईने बुधवारी अधिसूचना काढून या प्रकरणात सुधारणात्मक पावले उचलण्यात येतील, असे स्पष्ट केले.

व्यंकय्या म्हणाले की, संपूर्ण प्रकरणात प्रामुख्याने दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे हा पेपर खूप कठीण होता. हुशार विद्यार्थ्यांनाही तो सोडवणे कठीण गेले. दुसरा म्हणजे काही प्रश्न लीक झाले होते, त्यांची खरेदी-विक्री झाली, असे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. हे प्रकरण विद्यार्थी आणि त्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. त्याची चौकशी व्हायला हवी. काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल आणि आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन यांनी मंगळवारी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. वेणुगोपाल म्हणाले होते की, या प्रकरणात आवश्यक ती पावले उचलावीत, असे आवाहन मी सरकारला करत आहे.

अनेक विद्यार्थी रडतच बाहेर
१४ मार्चला झालेला गणिताचा पेपर अत्यंत कठीण होता, अशी तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी केली होती. अनेक परीक्षार्थी तर रडतच परीक्षा हॉलबाहेर पडले होते. प्रश्नपत्रिका फुटली होती, अशी माहितीही समोर आली होती. पण मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मात्र त्याबाबतचे वृत्त फेटाळले होते.
बातम्या आणखी आहेत...