आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसईने ग्रेस मार्कांचे धोरण कायम ठेवावे, जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीबीएसई १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत दिल्ली उच्च न्यायालयाने कठीण प्रश्नांच्या मोबदल्यात ग्रेस मार्क देण्याचे धोरण (मॉडरेशन) कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.
 
गतवर्षी विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरताना जे धोरण होते तेच कायम ठेवावे, असे आदेशात म्हटले आहे. एकदा खेळ सुरू झाल्यानंतर मध्येच नियम बदलता येत नसतात, असे काेर्टाने सुनावले. या याचिकेत मॉडरेशन धोरण थांबवले जाऊ नये, अशी मागणी होती. १२ वीच्या निकालावर याचा गंभीर परिणाम होईल, असे याचिकेत नमूद होते.

मॉडरेशन धोरण
अत्यंत कठीण, चुकीच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांच्या उत्तरांना काही गुण दिले जातात. गेल्या वर्षीपर्यंत हे धोरण सुरू होते. मात्र, हे धोरण बंद करण्याच्या प्रस्तावास सीबीएसईने ४ मे रोजी मंजुरी दिली होती.
 
बातम्या आणखी आहेत...