आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cchagan Bhujbal Comment On Raj Thackeray At New Delhi

किणी प्रकरणामुळे घाबरतो, छगन भुजबळ यांची राजवर तोफ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मफलर आवळून एकदाचे काय ते ‘बांधकाम’ उरकून टाकण्याची भाषा करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मी थोडे घाबरून आहे. राज्यात गाजलेले किणी खून प्रकरण सर्वांना ठाऊक आहेच. त्याला कसे आवळून मारले; पण बाहेर काही आले नाही. त्यामुळे आता मी सावध राहणार आहे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी सोमवारी प्रतिहल्ला केला.

पुण्यातील सभेत रविवारी राज यांनी टोल भ्रष्टाचाराला लक्ष्य केले. त्यात त्यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली. जागावाटप बैठकीसाठी भुजबळ येथे होते. ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले, मी मफलर बांधून फिरतो म्हणून मागून येऊन ते आवळून ‘बंदोबस्त’ करण्याची भाषा करणार्‍या राजच्या बोलण्याचा अर्थ मला ठार करावे, यापेक्षा वेगळा काय, असे ते म्हणाले.

अटक करून हीरो करू नका
निवडणुका जवळ असतानाच राज यांचा पक्ष ढेपाळला आहे. संपण्याच्या मार्गावर असलेल्या पक्षाला वर आणण्यासाठी राज यांचा हा खटाटोप आहे. माझ्याविरुद्ध आव्हानात्मक वक्तव्ये करून ते स्वत:ला अटक करवून राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. सरकारने अटक करून राज यांना हीरो करू नये, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.