आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक रेल्वे डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा, फ्लेक्सी दरातही सवलत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्या प्रत्येक डब्यात आणि रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. फ्लेक्सी फेअरच्या दरातही कपात होईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी केली. 

गोयल म्हणाले, ‘आवश्यक  ठिकाणी रेल्वेमार्गाच्या नूतनीकरणाचे व सध्याच्या सिग्नलिंग प्रणालीत सुधारणा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. फ्लेक्सी फेअर तिकीट प्रणालीचा आढावा घेऊन त्यावरही काम केले जाईल. या दर प्रणालीबाबत लोकांच्या तक्रारी असून दरात लवकरच कपात करू.’ रेल्वे पोलिस व तिकीट तपासणीसांना ड्यूटीच्या वेळी गणवेश अनिवार्य आहे. जीईच्या गुंतवणुकीमुळे बिहारमधील डिझेल रेल्वे इंजिन कारखाना बंद केला जाणार नाही, असेही ते म्हणाले. 
 
वर्षभरात सर्व रेल्वे  गेट बंद हाेणार 
आैरंगाबाद- रेल्वे गेटमुळे सर्वाधिक अपघात होत आहेत. वर्षभरात सर्व रेल्वे फाटके मानवरहित करण्याचे धोरण रेल्वेने आखल्याचे दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी सांगितले. रेल्वेगाड्या वेळेवर चालवणे आता दुय्यमस्थानी असल्याचेही यादव म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...