आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुलगाच हवा’, सेलिब्रिटींचाही हव्यास, चाचणीसाठी वाटेल ती रक्कम देण्याची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वंशाला दिवा हवा, अशी मागणी करणारे केवळ भारतातच आहेत, असे समजण्याचे कारण नाही. जगभरातील सेलिब्रिटींचाही हाच हट्ट आहे. अनेक सेलिब्रिटी अाधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भलिंग चाचणी करून घेऊ लागले आहेत. एशियन सेंटर फॉर ह्युमन राइट्सच्या (एसीएचआर) अहवालामध्ये हे वास्तव समोर आले आहे.
एसीएचआरचे संचालक सुहास चकमा म्हणाले, भ्रूणपरीक्षण करणाऱ्यांमध्ये चित्रपट, क्रीडा जगतातील अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. त्यांच्यातील मुलगाच हवा, असा हव्यास आता चव्हाट्यावर आला आहे. स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांचाही पर्दाफाश झाला आहे. थायलंडमध्ये गर्भलिंग चाचणी ही कायद्यानुसार वैध आहे. त्यामुळे जगभरातील सेलिब्रिटीज व इतर लोक पर्यटक म्हणून थायलंडमध्ये जातात. त्यात ७० ते ८० टक्के भारत, चीन व युरोपातील आहेत. एवढेच नव्हे, तर थायलंडमध्ये पदव्युत्तर पदवी केलेल्या ८० टक्के डॉक्टरांनी इतर आजाराऐवजी लिंग चाचणी करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

स्त्री भ्रूणहत्या राेखण्यासाठी भारत जगात सर्वात पिछाडीवर आहे. देशाचा चौथा क्रमांक लागतो. पाकिस्तान, नायजेरिया, ट्युनिशिया, व्हिएतनाम, जॉर्जिया व दक्षिण कोरियासारखे देश भारताच्या पुढे आहेत. या प्रकरणात लिचटेंस्टिनची परिस्थिती वाईट आहे. हा छोटा देश काळ्या पैशावाल्यांचा स्वर्ग आहे. त्यानंतर चीनची स्थिती वाईट आहे. भारत चौथ्या, तर पाकिस्तान १० व्या क्रमांकावर आहे.

दरवर्षी गर्भातच मारल्या जातात १५ लाख मुली : जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात दरवर्षी गर्भपाताची चार-पाच कोटी प्रकरणे समोर आली आहेत. अर्थात, सुमारे १.५ लाख गर्भपात होतात. मुलगा हवाच या हव्यासामुळे दरवर्षी सुमारे १५ लाख मुलींची गर्भातच हत्या होते.
स्त्री भ्रूणहत्येसंबंधीची काही तथ्ये
> युनिसेफच्या अहवालानुसार गर्भलिंग चाचणीमुळे भारताच्या लोकसंख्येतून सुमारे ५ कोटी मुली व महिला गायब आहेत.
> जगातील बहुतेक देशांत प्रती १०० मुलांमागे सरासरी १०५ मुलींचा जन्म होतो.
> संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार भारतात दररोज बेकायदा सरासरी २ हजार मुलींची गर्भातच हत्या केली जाते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...