आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Censor Board's 11 Members Resigned After Leela Samsong

केंद्राविरुद्ध सेन्सॉर बोर्डाचे बंड, 11 सदस्यांनी दिला राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाला मंजुरी दिल्याच्या निषेधार्थ सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांच्यापाठोपाठ आणखी ११ सदस्यांनी मोदी सरकार बोर्डाच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करत शनिवारी सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे मोदी सरकारच्या ‘सेन्सॉरशिप’चा मुद्दा चर्चेत आला आहे. बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी शुक्रवारीच राजीनामा दिला. त्यामुळे २३ सदस्यीय सेन्सॉर बोर्डात आता ११ सदस्य उरले आहेत.

सदस्यांचे आरोप
केंद्र सरकार सेन्सॉर बोर्डाला जी वागणूक देत आहे, ती पाहता स्वायत्तपणे आणि निर्भयपणे काम करणे अशक्य बनले आहे. त्यामुळे स्वाभिमान राखण्यासाठी आम्ही राजीनामे देत आहोत.

यांनी दिले राजीनामे
इरा भास्कर, लौरा प्रभू, पंकज शर्मा, राजीव मसंद, अभिनेत्री अरुंधती नाग, के.सी. शेखर बाबू, शाजी करुण, ममंग दई, एम. के. रैना, निखिल अल्वा. शर्मा काँग्रेस कार्य समितीचे सचिव आहेत.

सॅमसन यांचा आरोप
सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात केंद्र सरकारची ढवळाढवळ, दबाव आणि भ्रष्टाचारामुळे आपण अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- लीला सॅमसन, माजी अध्यक्षा

जेटलींचे प्रत्युत्तर
यूपीएने नेमलेले सदस्य राजकारण करत आहेत. भ्रष्टाचाराबाबत ते कधी शब्दानेही बोलले नाहीत. - अरुण जेटली, प्रसारणमंत्री