आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Center For Excellence In Higher Education, News In Marathi

नव्या क्षेत्रातील शिक्षणासाठी सेंटर फॉर एक्सलन्स उभारणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शालेय ते उच्च शिक्षणापर्यंत मोठा बदल करण्याची सरकारची भूमिका असून, अपारंपरिक ठरणार्‍या नव्या क्षेत्रात शिक्षणासाठी सेंटर फॉर एक्सलन्स उघडण्याची तयारी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने चालवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार हा बदल करण्यात येणार आहे. प्रस्तावानुरसा आधीच्या उच्च शिक्षण संस्थांचे सेंटर फॉर एक्सलन्सच्या रूपात अद्ययावतीकरण होणार आहे. ऊर्जा, नॅनो टेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग, स्टेम सेल रिसर्च अशा क्षेत्रासाठी हे सेंटर उभारले जातील.

आणखी प्रस्ताव :
०इतर देशांतील निवृत्त शिक्षकांना उच्च शिक्षण संस्थात बोलावणे
०सिनिअर्सना ज्युनिअरचा अभ्यासक्रम करण्याचे काम देणे
० सरकारी अनुदानाला इनोव्हेशन आऊटकमशी जोडणे
० इ-बुक्स व थ्रीडी इमेजला प्रोत्साहन, तंत्रज्ञानाचा वापर.