आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयआयटी, केंद्रीय संस्थांत परदेशी शिक्षक, केंद्राने सुरू केली भरती प्रक्रिया, अर्ज मागवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
नवी दिल्ली - आयआयटी तसेच केंद्रीय विद्यापीठांसह केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये परदेशी प्राध्यापकांची भरती प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. या प्राध्यापकांना महिन्याला भारतीय प्राध्यापकांपेक्षा तिप्पट म्हणजे वीस तास कामासाठी मासिक सुमारे साडेसात लाख रुपये वेतन दिले जाणार आहेत.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या वर्षभरात अशा संस्थांमध्ये सुमारे १ हजार परदेशी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार असून आतापर्यंत विविध संस्थांमध्ये ९३ अर्ज आले आहेत. केंद्राने या कामी मूळ भारतीय वंशाचे गणिततज्ञ मंजुल भार्गव यांना ब्रँड अम्बेसेडार म्हणून नेमले असून भार्गवर व संबंधित देशांच्या वकिलातींच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

उच्चशिक्षण विभागाचे सचिव एस. एन. मोहंती यांनी ही माहिती दिली. ‘ग्लोबल इनिशिएटीव्ह फार अकॅडेमिक नेटवर्क (ज्ञान)’अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यात जर्मनी, कॅनडा आणि ब्रिटनमधील प्राध्यापकांचे अधिक अर्ज आले असल्याचे मोहंती म्हणाले. या प्राध्यापकांचे वेतन निश्चित करण्यात आले असून िनयुक्तीनंतर त्यांना मासिक १२-१४ तास शिकवण्यासाठी ८ हजार अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे पाच लाख रुपये तर १८-२० तासांसाठी १२ हजार अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे साडेसात लाख रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी, केंद्रीय विद्यापीठांसह केंद्रीय उच्चशिक्षण संस्थांमध्ये या परदेशी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार आहे. संबंधित संस्था व विद्यापीठे निवड केलेल्या प्राध्यापकांशी थेट संपर्क साधून दिवस निश्चित करण्णार असून त्यानंतर या प्राध्यापकांची सेवा सुरू होईल. ज्या प्राध्यापकांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत अशा अर्जांची उच्चशिक्षण विभागाच्या वतीने पडताळणी होणार आहे.

या परदेशी शिक्षकांबरोबर काही भारतीय प्राध्यापकांनाही संधी दिली जाणार आहे. प्राध्यापकांची वानवा म्हणून नव्हे, तर परदेशी प्राध्यापकांचे अनुभव भारतीय विद्यार्थ्यांना शिकता यावेत, हा यामागचा मूळ उद्देश आहे. यामुळे भारतीय संस्थांतील गुणवत्तेचा दर्जा उंचावेल, अशी उच्चशिक्षण विभागाला आशा आहे. शिक्षण संस्थांच्या जागतिक क्रमवारीचा विचार करता ज्या संस्थांमध्ये विदेशी शिक्षक किंवा प्राध्यापक आहेत अशा संस्था वरच्या क्रमावर असतात. किंबहुना या क्रमवारीसाठी विदेशी प्राध्यापक हा एक प्रमुख निकष आहे.
बातम्या आणखी आहेत...