आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मांतरित बौद्धांसाठी सुधारित जात प्रमाणपत्र, विधानसभेच्या जागाही वाढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२६ वर्षांपासून प्रलंबित विषयावर येत्या महिनाभरात कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाइल फोटो) - Divya Marathi
२६ वर्षांपासून प्रलंबित विषयावर येत्या महिनाभरात कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाइल फोटो)
नवी दिल्ली - अनुसूचित जातीतून धर्मांतरित झालेल्या बौद्धांना केंद्रामध्ये अनुसूचित जातीचे सर्व लाभ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून यासंदर्भात केंद्र सरकार लवकरच सुधारित जात प्रमाणपत्र नमुना काढणार अाहे. यामुळे राज्यातील 65 लाख तर देशातील 5 काेटी बाैद्धांना अारक्षणाचा लाभ मिळणार असून विधानसभेच्या जागाही वाढणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
26 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न
>> सुधारित प्रमाणपत्र काढण्यात यावे यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे बडाेले यांनी सांगितले.
>> या 26 वर्षांपासून प्रलंबित विषयावर येत्या महिनाभरात कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील अनुसूचित जातीतून धर्मांतरित झालेल्या बौध्दांना या निर्णयामुळे मोठा लाभ मिळणार अाहे.
>> बैठकीला खासदार रामदास आठवले, महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल.थुल उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आता कसा होणार फायदा
बातम्या आणखी आहेत...