नवी दिल्ली - गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये परत न केल्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या कार्यालयावर आज (शनिवार) प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. विभागाच्या अधिकार्यांनी सहारांच्या दिल्लीतील ग्रेटर कैलाश आणि नोएडामधील कार्यालयातून आवश्यक ती कागदपत्रे ताब्यात घेतील आहेत. ही कारवाई अंमलबजावणी संचलनालयाकडून दाखल मनी लाँडरींग प्रकरणी करण्यात आली आहे. निदेशालय या प्रकरणी सुब्रतो रॉय यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
इडीने दाखल केला होता गुन्हा
इडीने गुतंवणूकदारांचे कोट्यवधी रुपये परत न केल्या प्रकरणी या वर्षी सहारा समुहाविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी प्राथमिक तपास केल्यानंतर सेबीला अहवाल मिळाल्यानंतर इडीने मुंबईतील विभागीय कार्यालयात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये परत न केल्याप्रकरणी सहारा प्रमुख सुब्रतो रॉय मार्चपासून तुरुंगात आहेत.
1978 मध्ये सहारा इंडियाची स्थापना
सुब्रतो रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारमधील अररिया जिल्ह्यात झाला. सुब्रतो रॉय हे भारतातील नावाजलेल्या उद्योगपतींमध्ये गणले जातात, ते सहारा इंडियाचे संस्थापक, संचालक अध्यक्ष आहेत. इंडिया टुडेच्या यादीत त्यांचे नाव देशातील सर्वाधिक श्रीमंत दहा भारतीयांमध्ये घेतले होते. 1978 मध्ये सुब्रतो रॉय यांनी सहारा इंडियाची स्थापना केली. 2004 मध्ये टाइम मॅगझीनने भारतीय रल्वेनंतर देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून सहाराचा उल्लेख केला होता.
पुढील स्लाइडमध्ये, दुसर्या देशाचे नागरिकत्व स्विकारू शकतात सुब्रतो