आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय कर्मचा-यांच्या ‘डीए’मध्ये 10 % वाढ, केंद्र सरकारचा सुखद धक्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने सणासुदीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचा-यांना सुखद धक्का देत महागाई भत्त्यामध्ये (डीए) 10 टक्के वाढ केली आहे. हा भत्ता 80 टक्क्यांवरून 90 टक्के करण्यात आला. गेल्या 1 जुलैपासून ही वाढ लागू केली आहे.


पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय झाला. 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 30 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाकाठी सुमारे 10 लाख 85 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. चालू आर्थिक वर्षात हा अतिरिक्त बोजा सुमारे 7 लाख 25 हजार कोटींचा असेल. यापूर्वी सरकारने एप्रिलमध्ये डीएत 8 टक्के वाढ केली होती.


मंत्रिमंडळाचे अन्य निर्णय : सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ‘राष्‍ट्रीय बाल सुरक्षा व शैक्षणिक धोरण’ मंजूर करण्यात आले. बालवाडीतील (प्ले ग्रुप) मुलांचे शिक्षण व सुविधांचे निकष निश्चित करणे व त्यावर देखरेख करण्याची तरतूद या धोरणात आहे.अन्नसुरक्षा अभियानासाठी बाराव्या पंचवार्षिक योजनेत 12 हजार 350 अब्ज रुपयांची तरतूद.