आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी पगारवाढ! केंद्राने केली समिती स्थापन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकार वेतन आयोगाची परंपरा बंद करून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी पगारवाढ करण्याच्या पर्यायाच्या विचारात आहे. हा निर्णय झाल्यास लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळेल. यासाठी सरकारने एका समितीचे ही गठन केल्याची माहिती कळते. तथापि, सध्या दरवर्षी पगारवाढ दिल्यास त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील याचा विचार ही समिती करणार आहे. 
 
लवकरच मिळू शकते खुशखबर
अर्थ मंत्रालयातील सूत्रांनुसार, दर दहा वर्षांनी देण्यात येणाऱ्या वेतान आयोगाची परंपरा केंद्र सरकारला संपुष्टात आणायची आहे. त्याऐवजी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी नियमित पगारवाढ द्यावी, असा सरकारचा विचार आहे. त्यासाठी काही परिमाणे निश्चित करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. यामुळे लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
 
केंद्राप्रमाणे राज्यांनाही घ्यावा लागेल निर्णय!
नुकत्याच लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांनीही केंद्र सरकारला दरवर्षी पगारवाढीची शिफारस केली होती. त्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने सकारात्मक विचार करणे सुरू केल्याचे कळते. वेतन आयोग बंद करायचा की नाही, याबाबत राज्यांनाही विश्वासात घेतले जाणार आहे, कारण केंद्राने दरवर्षी पगारवाढ दिल्यास, राज्यांनाही त्याप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तरतूद करावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...