आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Government Employee DA Incise News In Marathi

निवडणुकींच्या तोंडावर केंद्रीय कर्मचार्‍यांची दिवाळी; पगारात होणार 35 टक्क्यांनी वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याच्या (डीए) मूळ वेतनात समावेशाबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. सध्या डीए 40 टक्के आहे. त्यापेक्षा अधिक झाल्यास त्याचा मूळ वेतनात समावेश केला जातो. पूर्ण डीएचा पगारात समावेश झाल्यास कर्मचार्‍यांचे वेतन 35 टक्क्यांनी वाढणार आहे.

सरकारने हा निर्णय घेतल्यास केंद्र सरकारचे 50 लाख कर्मचारी आणि 30 लाख निवृत्तवेतनधारकांना लाभ मिळेल. सातव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. डीएमध्ये पुढील महिन्यात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमांनुसार जेव्हा डीए 50 टक्क्यांपेक्षा अधिक होता तेव्हा तो मूळ वेतना समाविष्ट करण्यात येतो.

पुढील स्लाइडवर वाचा, पीएफवर 8.75 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव...