आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 8 टक्क्यांनी वाढ, बिहारला विशेष पॅकेज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोन्याचे घसरते दर. पेट्रोलदरात एक रुपयांची घट या पाठोपाठ केंद्र सरकारी कर्मचा-यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 8 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजूरी दिली आहे. त्यासोबतच बिहारला विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले.

आर्थिक मुद्यांसदर्भात केद्रीय मंत्रिमंडळाची गुरूवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्याबरोबरच इतरही निर्णय घेण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या काही महिन्यांपासून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरीला आहे. या मागणीला केंद्राने विरोध केला असला तरी, आज झालेल्या बैठकीत बिहारसाठी 12 हजार कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारी कर्मचा-यांना सध्या 72 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तो आता 80 टक्के दिला जाणार आहे. या निर्णयाचा फायदा देशातील 50 लाख कर्मचारी आणि 30 लाख पेन्शनर्सना मिळाणार आहे.