आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडधान्याच्या हमी भावात ~२५० वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाचा शेतकऱ्यांना दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू रब्बी हंगामासाठी कडधान्याच्या किमान हमी भावात क्विंटलमागे २५० रुपये वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत गुरुवारी किमान हमी भाववाढीला मंजुरी देण्यात आली.

गव्हाच्या किमान हमी भावात क्विंटलमागे ७५ रुपये वाढ झाली अाहे. गव्हाचा हमी भाव क्विंटलमागे १४५० रुपयांवरून १५२५ रुपये करण्यात आला आहे. बार्लीचा (जव किंवा सातू) हमी भाव क्विंटलमागे ११५० रुपयांवरून १२२५ रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. तर हरभऱ्याचा हमी भाव क्विंटलमागे ३१७५ वरून ३४२५ रुपये करण्यात आला आहे.

याशिवाय हरभरा आणि मसूर डाळीसाठी क्विंटलमागे ७५ रुपय अतिरिक्त बोनस देण्यात येणार असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. डाळीच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी व कडधान्ये लागवडीत वाढ होण्यासाठी सरकारने हमी भावात वाढ केली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने हरभरा आणि मसूर डाळीसाठी क्विंटलमागे अतिरिक्त ७५ रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात गोयल यांनी सांगितले, यंदाच्या २०१५-१६ च्या रब्बी हंगामासाठीच्या रब्बी धान्यांच्या किमान हमी भावात वाढ करण्यात आली आहे. कृषी मूल्य व किमत आयोगाच्या शिफारशीनुसार ही वाढ करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी, करडई आदी पीक उत्पादकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

उत्पादन वाढीसाठी पाऊल
देशातील कडधान्ये लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन वाढावे यासाठी केंद्राने कडधान्याच्या हमी भावात घसघशीत वाढ केली असल्याचे मत गोयल यांनी व्यक्त केले. केंद्राने हरभरा आणि मसुरच्या हमी भावात ८ टक्के वाढ केली अाहे. तसेच या डाळींसाठी क्विंटलमागे ७५ रुपये बोनस देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...