आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५००मध्ये तासभर ‘उडान’, सामान्यांना विमानप्रवासासाठी केंद्र सरकारची नवी योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार सामान्य लोकांसाठी विभागीय संपर्क योजना अर्थात ‘उडान’ सुरू करत आहे. यानुसार, छोट्या शहरांना हवाई मार्गाने जोडले जाईल. या मार्गांवर एक तासाच्या प्रवासासाठी केवळ २५०० रुपये तिकीट लागेल. याची भरपाई करण्यासाठी मोठ्या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून उपकर घेतला जाईल. यामुळे काही विमान कंपन्या नाराज आहे. ही जगातील या प्रकारची पहिलीच योजना असल्याचा सरकारचा दावा आहे.
निवडक विमानतळांची निवड
या योजनेत सरकारने ज्या विमानतळाच्या धावपट्टीवर आठवड्यात सातहून अधिक विमान उड्डाणे नाहीत अशा शहरांची निवड केली आहे.
जानेवारीत प्रारंभ
> विमानात कमीत कमी ९ आसने व जास्तीत जास्त ४० आसने असतील.
> ५० % आसने ‘उडान’साठी आरक्षित असतील. त्याचे भाडे २५०० रुपये असेल आणि उर्वरित ५० टक्के आसने बाजार आधारित किंमतीनुसार.
> देशात सध्या ३९४ विमानतळ हवाई सेवेशिवाय अस्तित्वात आहेत.
१६ विमानतळांवर कमी सेवा आहेत.
> देशांतर्गत विमान वाहतुकीला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे.
बातम्या आणखी आहेत...