आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Central Government Not Accepting To Give The Special Status To The State

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष राज्यांचा दर्जा देणे कठीण : पी चिदंबरम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बिहारसह सध्या इतर राज्यांमधून विशेष राज्यांचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. त्याबाबत अनेक प्रादेशिक पक्ष केंद्र सरकारवर दबाव वाढवत असले तरी त्यांची ही मागणी मान्य होणे कठीण आहे. तसे संकेत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिले आहेत.


बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या आठवड्यात राजधानीत जोरदार रॅली घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. बिहारपाठोपाठ ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आदी राज्यांनीही विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. चिदंबरम म्हणाले की, ‘प्रत्येक राज्याची विशेष श्रेणी आहे. नियोजन आयोगाच्या शिफारशी व केंद्र सरकारच्या योजनांनुसार राज्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे निधी दिला जातो. त्यामुळे त्यात कुणाला विशेष राज्यांचा दर्जा देण्याचा मुद्दा होऊ शकत नाही.’ राजस्थानच्या मागणीवरही चिदंबरम यांनी हेच उत्तर दिले.


स्पष्टीकरणामागचा अर्थ
विशेष राज्याबाबत अनेक राज्ये केंद्र सरकारवर दबाव आणत होती. असा दबाव आणणाºया बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह इतर राज्यांना तुमची मागणी मान्य होणे कठीण असल्याचा संदेश दिला आहे. देशाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून वाटचाल करत असल्याने केंद्र सरकार खर्चात कपात करण्यासाठी राज्यांना सातत्याने आवाहन करत आहे. या स्थितीत एखाद्या राज्याला विशेष दर्जा दिला तर सरकारवरील खर्चाचा बोजा वाढू शकतो. त्यामुळे अर्थमंत्री चिदंबरम त्याच्याशी सहमत नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी आरबीआयचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यांना याबाबत सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.


परिणाम काय?
विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर नितीशकुमार यांना यूपीए आघाडीत ओढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, परंतु चिदंबरम यांच्या या स्पष्टीकरणामुळे त्या प्रयत्नाला धक्का बसला आहे. त्याचबरोबर या मागणीसाठी ममता बॅनर्जी व मुलायमसिंह केंद्रावर दबाव वाढवू शकतात. राजस्थानसह निवडणुका असलेल्या अनेक राज्यांत लाभ घेण्याच्या प्रयत्नांनाही धक्का बसेल.