आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Government Set Up Inquiry Commission Against Narendra Modi In Spying Of A Woman Allegation

महिलेवर पाळत ठेवल्‍याप्रकरणी केंद्राकडून चौकशी आयोगाची नेमणूक, भाजपचा तिळपापड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गुजरातचे मुख्‍यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत. महिलेच्‍या हेरगिरीप्रकरणाचा तपास करण्‍यासाठी आयोग नेमण्‍याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. कोब्रापोस्‍ट आणि गुलेल डॉट कॉम या संकेतस्‍थळानी केलेल्‍या स्‍टींग ऑपरेशनमध्‍ये हे प्रकरण उजेडात आले होते. 'साहेब' सांगतात त्‍याप्रमाणे एका महिला आर्किटेक्‍टची हेरगिरी करण्‍यात आल्‍याचे या स्‍टींग ऑपरेशनमध्‍ये दाखविण्‍यात आले होते. हे साहेब म्‍हणजे नरेंद्र मोदी असल्‍याचा दावा करण्‍यात आला आहे. आता केंद्र सरकारने याप्रकरणी आयोग स्‍थापन करुन मोदींच्‍या अडचणी वाढविल्‍या आहेत.

केंद्राच्‍या निर्णयानंतर भाजपने निषेध व्‍यक्त केला आहे. राज्‍यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी सरकारच्‍या हेतूवर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले आहे. हा निर्णय कायद्याच्‍या दृष्‍टीने चुकीचा आहे. कॅबिनेटकडून तपास आयोगाची स्‍थापनेचा निर्णय घटनेला धरुन नाही. या निर्णयाला न्‍यायालयात आव्‍हान देऊन असे जेटली म्‍हणाले.

पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी सांगितले, की कॉंग्रेसला मोदींपासून भीती आहे. म्‍हणूनच ते आणीबाणीच्‍या काळातील डावपेच आखत आहेत. कॉंग्रेसच्‍या कामाचे उत्तर जनताच देईल. हा मोदींविरुद्ध कट असल्‍याची टीका भाजपच्‍या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.


स्‍टींग ऑपरेशन करणा-या संकेतस्‍थाळाने केलेल्‍या दाव्‍यानुसार, ही महिला कोणावर प्रेम करते, हे जाणून घेण्‍यात गुजरात सरकारचा रस होता. त्‍या महिलेच्‍या सुरक्षेचीही सरकारला चिंता नव्‍हती. तिची माहिती जाणून घेण्‍यासाठी मोदी आणि तत्‍कालीन येडीयुरप्‍पा सरकारमध्‍ये तिच्‍या मोबाईल क्रमांकाबाबत चर्चाही झाली होती. तिचा बंगळुरु येथील मोबाईल क्रमांक इंटरसेप्‍टही करण्‍यात आला होता.

गुलेलडॉटकॉमने या महिलेची हेरगिरी फक्त गुजरातच नव्‍हे तर इतर राज्‍यांमध्‍येही केल्‍याचा खळबळजनक दावा मंगळवारी केला होता. त्‍यासंबंधी 39 ऑडिओ टेप्‍स सादर करण्‍यात आल्‍या होत्‍या. आता केंद्राने आयोगाची स्‍थापना करण्‍यास मंजूरी दिल्‍यामुळे मोदींना कोंडीत पकडण्‍याचा सरकारचा प्रयत्‍न असल्‍याचे जाणकार मानतात.