आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२५ दलित विद्यार्थ्यांना केंद्र स्वखर्चाने शिकवणार, मोदी देणार ‘संविधान दिनी’ गाेड बातमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डाॅ. बाबासाहेब अांबेडकर विदेशात ज्या विद्यापीठांत शिकले तिथे देशातील १२५ दलित विद्यार्थ्यांना अाचार्य पदवीचे शिक्षण देऊन त्याचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे. त्याबाबतची योजना सरकारच्या विचाराधीन असून त्याची घाेषणा पंतप्रधान नरेंद्र माेदी ‘संविधान दिनी’ म्हणजेच २६ नोव्हेंबरला करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या १२५ व्या जन्मशताब्दी वर्षाचे अाैचित्य साधून पंतप्रधान माेदींनी दलितांसाठी योजनांचा धडाका लावला अाहे. मुंबईतील इंदू मिलची जागा डाॅ. अांबेडकरांच्या स्मारकासाठी मिळवून दिली व त्याचे भूमीपूजनही केले. डाॅ. अांबेडकर १९२१-२२ मध्ये लंडन येथे स्कूल अाॅफ इकाॅनाॅिमक्स येथे शिकत असताना १० किंग हेन्रीज राेड येथे राहत असत. महाराष्ट्र सरकारने ते निवासस्थान विकत घेतले असून माेदींनी नुकतेच डाॅ. अांबेडकरांचे लंडन येथील स्मारक स्थळ म्हणून उद्घाटन केले अाहे. काँग्रेसने दलित मतदार अापल्याशिवाय कुठेही जात नाही असे गृहीत धरल्याने त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकांकडे दुर्लक्ष केले हाेते. माेदींनी नेमकी ही बाब हेरून दलित समुदायास खूष करणाऱ्या या दाेन्ही गाेष्टींची पूर्तता केली. देशाची घटना दि. २६ नाेव्हेंबर १९४९ राेजी संमत करण्यात अाली हाेती. डाॅ. बाबासाहेब अांबेडकर हे त्या मसुदा समितीचे अध्यक्ष हाेते. माेदी यांनी अत्यंत उदारपणे याचे संपूर्ण श्रेय डाॅ. अांबेडकरांना देण्याचा निश्चय करीत २६ नाेव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून पाळण्याची घाेषणा केली अाहे.

डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे करण्यासाठी समिती गठित करण्यात अाली अाहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी अध्यक्ष अाहेत. या समितीत राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, सुरेश प्रभू, स्मृती इराणी या मंत्र्यांसह काही अशासकीय सदस्य अाहेत. प्रत्येकाला घटनेबाबत माहिती असावी यासाठीचे नियाेजन करणे व जर्मनीप्रमाणे त्यांना घटनेची प्रत देणे, दहावीच्या अभ्यासक्रमात घटनेबाबत अधिकाधिक माहिती असणे याबाबत समिती नियाेजन करत अाहे परंतु याबाबी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी किमान तीन वर्षाचा कालावधी लागू शकताे.

संविधान दिनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत संविधानाचे सामुहिक वाचन करण्याच्या सूचनाही पुढे अाल्या अाहेत.त्यावर सरकार विचार करत आहे.
नागरिकशास्त्राला महत्त्व देण्याची मोदींची सूचना
संविधान दिनाच्या निमित्ताने त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकास घटना माहिती असावी म्हणून नागरिक शास्त्र या विषयाचे महत्व वाढविण्याचा मोदींचा विचार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी एक याेजना अाखली अाहे. या विषयातील ५० टक्के भाग हा भारतीय घटनेवर अाधारित असावा, असे दिशानिर्देश त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना िदले असल्याची माहिती सूत्रांनी दिली अाहे.
अभ्यास दौऱ्याऐवजी विद्यार्थी शिक्षण
डाॅ. अांबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे अाैचित्य साधून देशभरातील १२५ अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना लंडन येथील स्कूल अाॅफ इकाॅनाॅमिक्स, काेलंबिया विद्यापीठात अाचार्य पदवीचे शिक्षण घेण्यासाठी पाठवावे, त्यात ६५ विद्यार्थिनींचा सहभाग असावा व त्याचा संपूर्ण खर्च सरकारने उचलावा असे सुचविले. या सूचनेस अन्य सदस्यांनीही अनुमती दर्शविली. संविधान दिनी पंतप्रधान त्याची घाेषणा करू शकतात.
बातम्या आणखी आहेत...