आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खासदारांच्या पत्रांना त्वरित प्रतिसाद द्या’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्व खासदारांच्या प्रश्न, माहिती आणि पत्रांना त्वरित उत्तरे पाठवा, त्यांनी साधलेल्या संपर्काला यंत्रणेने प्रतिसाद द्यावा, अशा मार्गदर्शक सूचना केंद्राने त्यांच्या सर्वच विभागांना केल्या आहेत. यात मनुष्यबळ विकास खाते, सार्वजनिक वा लोक तक्रार निवारण-पेन्शन खाते या लोकाभिमुख खात्यांकडून खासदारांच्या पत्राला उत्तरे देताना जो वेळ होतो त्यामुळे केंद्राने हे पाऊल उचलले आहे.
संसदेच्या अधिवेशनकाळातही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या सत्रकाळातही न आल्याने मंत्रालयाने काही विभागांच्या या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यामुळे केंद्रीय सचिवालयाने ऑफिस मॅन्युअलच्या प्रोसिजरमध्ये या कडक सूचना केल्या आहेत. यात पुढे असे म्हटले गेले आहे की, खासदार वा कुठल्याही व्हीआयपीने विचारलेल्या प्रश्नांना वा त्यांनी पाठविलेल्या पत्रांना सर्व विभागांना १५ दिवसांच्या आत अॅक्नॉलेज (उत्तर देणे) करणे बंधनकारकच असेल.
संसदेच्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तरी सर्व केंद्रीय विभाग संवेदनशीलतेने काम करतील आणि खासदारांसह संबंधितांच्या पत्रांना त्वरित उत्तरे देतील, अशी आशा आहे.
बातम्या आणखी आहेत...