आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळात राज्याला दिलासा : गोसीखुर्द प्रकल्पाला केंद्राकडून 405 कोटींचा निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यात महत्त्वपूर्ण ठरणा-या गोसीखुर्द प्रकल्पाला केंद्राकडून 405 कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आला आहे. वेगवर्धीत सिंचन लाभ प्रकल्पाअंतर्गत राज्य शासनाकडे या प्रकल्पासाठी हा निधी वळता करण्यात आला आहे.

गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाला असून पूर्णत्वाकडे आलेल्या या प्रकल्पाला सन 2012-2013 या आर्थिक वर्षासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून आवश्यक निधी मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु ठेवला आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस राज्यातील गोसीखुर्द या प्रकल्पासोबतच अरुणा पाटबंधारे प्रकल्पाला 14.18 कोटी, वाघुर पाटबंधारे प्रकल्पासाठी 76.23 कोटी मंजूर करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या वित्त विभागाने 28 मार्च 2013 रोजी या निधीला मंजूरी दिली आहे.