आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Home Minister Rajnath Singh's Statement On Dawood In Loksabha

दाऊद पाकिस्तानातच, सरकार त्याला भारतात आणणार; राजनाथ सिंह यांचा संसदेत दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी संसदेत म्हटले की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच आहे. भारत सरकार त्याला परत देशात आणणारच असा दावाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केला आहे.

राजनाथ यावेळी म्हणाले की, दाऊद 1993 बॉम्ब स्फोट प्रकरणी वाँटेड गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आले आहे. भारताकडे तो पाकिस्तानाच असल्याची पक्की माहिती आहे. वेळो वेळी पाकिस्तानलाही याची माहिती देण्यात आली आहे. रेड कॉर्नर नोटीस काढलेली असल्याने पाकिस्तान त्याचा शोध घेण्यास बांधील आहे. तरीही पाकिस्तान या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यास अपयशी ठरला आहे. आम्ही त्यांच्यावर दबाव कायम ठेवला आहे. यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल पण आम्ही दाऊदला भारतात परत आणूच अशा शब्दांत राजनाथ यांनी आपले म्हणणे मांडले. याआधी 5 मे रोजी गृह राज्यमंत्र्यांनी दाऊद कुठे आहे, याबाबत निश्चित माहिती सरकारकडे नसल्याचे वक्तव्य केले होते. विरोधीपक्षांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर राजनाथ सिंह यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

पाकच्या 'वॉचलिस्ट'मध्ये दाऊद नाही, रेड कॉर्नर नोटीसनंतरही फिरतो मोकाट
दरम्यान, दाऊदच्या मुद्यावरून संसदेत गोंधळ सुरू असतानाच, दाऊद पाकिस्तानच्या 'वॉचलिस्ट'मध्ये नसल्याचे म्हटले होते. इस्लामाबाद इंटरपोल डिव्हीजनच्या मते पाकिस्तानने भारताकडून मिळालेल्या माहितीकडे दुर्लक्ष केले आहे. दाऊदवर नजरही ठेवली जात नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानात इमिग्रेशन रेकॉर्डमध्येही त्याच्या पासपोर्टबाबत काहीही माहिती नाही. वॉचलिस्टमध्ये नसल्याने दाऊद विमानतळावरून बिनधास्त येजा करतो अशी माहितीही मिळाली आहे.