आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय कर्मचा-यांचे निवृत्ती वय 62 वर्षे करण्याची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकार आपल्या कर्मचा-यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा 60 वरून 62 वर्षांवर आणण्याची तयारी करत आहे. कामगार मंत्रालयाने हा प्रस्ताव वित्तमंत्रालयाकडे पाठवला होता. त्याच्या संमतीनंतर तो आता पंतप्रधान कार्यालयाकडे आला आहे. त्याची व कॅबिनेटची मंजुरी मिळताच याबाबत घोषणा केली जाईल. यासाठी महिना-दोन महिन्यांची वेळ लागू शकते.


या मुद्द्यावर सरकार मात्र गोपनीयता बाळगून आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री तथा कामगार मंत्री व्ही. नारायण सामी यांनी दिव्य मराठी नेटवर्कशी बोलताना ‘हा प्रस्ताव सध्या डीओपीटीसमोर’ असल्याचे सांगत त्याची पुष्टी केली. मात्र निर्णयास मात्र तूर्त काही वेळ लागू शकते. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारने 1998 मधील पोखरण अणुचाचणीनंतर लगेचच कर्मचा-यांचे निवृत्तीवय 58 वरून वाढवत 60 वर्षे केले होते.


निवृत्तीनंतर केल्या जाणा-या एकमुश्त पेमेंटचा खर्च वाचवणे हा सरकारचा इरादा आहे. यामुळे सुमारे पाच कोटी रुपयांची वार्षिक बचत होईल. डबघाईस आलेल्या सरकारच्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम महत्त्वाची आहे. सरकार त्याचा उपयोग अन्न सुरक्षेसारख्या लोकप्रिय योजनांवर करणार आहे. पुढील वर्षी होणा-या सार्वत्रिक निवडणुकांत या योजनांचा राजकीय फायदा घेण्याचा सरकारचा इरादा आहे.


केंद्र सरकारच्या 15 लाख कर्मचा-यांना निवृत्ती वयोमर्यादेतील वाढीचा थेट फायदा मिळणार आहे. याच कर्मचा-यांच्या कुटुंबीयांच्या मतांच्या रूपात याचा फायदा मिळवण्याची आशा सरकारला आहे.