आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र पुरस्कृत योजनांची संख्या ७२ वरून ३०

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची संख्या ७२ वरून घटून ३० होणार आहे. नीती आयोगाच्या मुख्यमंत्र्यांच्या एका उपसमितीचे यावर एकमत झाले आहे. पाच जुलैपर्यंत अंतिम आराखडा अहवाल तयार होईल. सर्व सदस्यांच्या सहमतीनंतर अहवाल पंतप्रधानांकडे पाठवला जाईल.

नीती आयोगाच्या या उपसमितीची बैठक शनिवारी दिल्लीत झाली. उपसमितीचे संयोजक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, केंद्रीय मदतीतून चालणार्‍या या योजना दोन भागांत विभाजित करण्याबाबत सहमती झाली आहे. एक भाग कायदेशीर आधार असणार्‍या मुख्य योजनांचा असेल. ज्या योजना लागू करणे राज्यांना अनिवार्य नाही त्यांचा समावेश दुसर्‍या भागात करण्यात आला आहे. नीती आयोगाचे सीईओ सिंधुश्री खुल्लर यांच्या अध्यक्षतेखालील समिती आता आराखडा तयार करत आहे. या समितीच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या आहेत. शेवटची बैठक २८ मे रोजी भोपाळमध्ये झाली होती. शनिवारच्या बैठकीस मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश, नागालँडचे मुख्यमंत्री उपस्थित होते. सरकारने अगोदरच अव्यवहार्य योजना बंद करणार असल्याचे म्हटले. दरम्यान, ५ जुलै राेजी अंतिम आराखडा तयार करण्यात येईल. तशी सूचना राज्यांना देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...