आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Centre Aid Want In Naxalite Devendra Fadnvais Demand

नक्षलग्रस्त भागातील रस्ते; केंद्राची मदत हवी - देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्यातील नक्षलग्रस्त भागातील प्रलंबित रस्ते व रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाने साह्य करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत केली.
नक्षलग्रस्त राज्यांतील प्रलंबित विकास प्रकल्पांच्या आढावा सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग, महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, केंद्रीय गृह सचिव एल. सी. गोयल तसेच गृह, वित्त, रेल्वे, मानव संसाधन, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, वन विभाग व पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नक्षलग्रस्त भागातील रस्ते, पूल, रेल्वेमार्ग, मोबाइल टॉवर, पोस्ट ऑफिस, बँक, शिक्षण, आरोग्य, रेडिओ व चित्रवाणी प्रसारण तसेच या प्रकल्पांसाठी लागणा-या पर्यावरणविषयक मंजुरी यासंदर्भातला व्यापक आढावा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला.
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागातील विविध समस्या तसेच विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करताना येणा-या अडचणी यासंदर्भात लक्ष वेधले.
नक्षलग्रस्त भागातील इंदिरावती पूल आणि १५० कि.मी. अंतराचे रस्ते व रेल्वे प्रकल्पांकडे लक्ष वेधले. या प्रकल्पास केंद्राने साह्य करावे, अशी मागणी त्यांनी केली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यांना केंद्र शासनाकडून सर्व प्रकारची मदत तत्काळ मिळेल, अशी ग्वाही दिली. सर्व प्रकारच्या विकासकामांना केंद्र शासनाकडून आवश्यक असणा-या परवानग्या लवकरात लवकर मिळाव्यात, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले. नक्षलग्रस्त भागातील विकासकामांना तसेच योजना राबविताना नियमांमध्ये शिथिलता आणावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गृहमंत्र्यांकडून आढावा
नक्षलग्रस्त राज्यांतील प्रश्न सोडवण्यासाठी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी या राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सूचना मांडल्या. विशेषत: विकासविषयक कामांवरच बहुतेक राज्यांनी या बैठकीत भर दिला.