आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Centre Appoint Committee For Researching Of Uttarkhand Flood Cause

शोधाशोध महाप्रलयाची: उत्तराखंड आपत्तीचे कारण शोधण्‍यासाठी केंद्राची समिती नियुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तराखंडमधील महाप्रलयाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली असून गंगा पूर नियंत्रण आयोगाचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष आहेत.


या नैसर्गिक संकटामुळे नुकसानग्रस्त झालेल्या गावांमध्ये पावसाचे थेंबही पडले तरी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मंगळवारी रात्री उत्तराखंडच्या बाजड या गावात जोरदार पाऊस पडला. येथे राहणा-या 65 वर्र्षीय विमलादेवी यांच्या मते, त्यांनी आपल्या आयुष्यात इतका जोरदार पाऊस कधीच बघितला नव्हता. या पावसामुळे नदीचा पूर रात्रभरात प्रचंड वाढल्याने गावातील पूल सकाळपर्यंत वाहून गेले. 17 जून रोजी अलकनंदा नदीने रौद्ररूप धारण केले होते. या नदीतील पाण्याचा प्रवाह आता जरी कमी झाला असला तरी यामुळे झालेल्या नुकसानीमुळे लोकांच्या मनातील भीती सध्याही कायमच आहे. रुद्रप्रयाग आणि देवप्रयागमध्ये लोकांनी शाळेत आश्रय घेतला होता. गर्दीमुळे दोन आठवड्यांनंतर स्थानिक लोक घरी परतले आहेत, परंतु त्यांना परत नव्या जागेचा शोध घ्यावा लागत आहे.


या उत्तरांचा शोध
० नदीचे पात्र का रुंदावले?
० नदीचा प्रवाह कसा बदलला?
० डोंगरउतारावरून नदीप्रवाहात माती,गाळ कसा आला?
० धोक्याची पूर्वसूचना देणारे तंत्र किती प्रभावी?
० ग्लेशियर असलेल्या टेकड्यांवर निगराणीची काय व्यवस्था?