आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र घेणार १५ हजार टन कांदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांकडून १५ हजार टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केंद्र सरकारने बुधवारी केली.

लोकसभेत शून्य प्रहरात कांद्याचा मुद्दा आल्यानंतर अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, सरकारने १५ हजार टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यांत पथके पाठवत आहोत. मागच्या वर्षीच्या १८९ लाख टनाच्या तुलनेत यंदा देशात २०३ लाख टन कांदा झाला. नाशिकमध्ये आधीच साठवण सुविधा असल्यामुळे तेथे कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. केंद्र खासगी क्षेत्रालाही कांदा खरेदीसाठी निमंत्रित करत आहे, असे पासवान म्हणाले.

पैठणला कांद्याला १ रुपया किलो भाव
बाजार समितीत बुधवारी कांद्याला १ रुपया किलो भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला व हमी भावाच्या मागणीसाठी तहसीलवर मोर्चा काढला. बुधवारी कांद्याची आवक साडेसहा हजार गोण्यांवर पोहाेचल्याने भाव घसरल्याचे बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...