आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेत गोंधळातच बोलल्या सुषमा - मी ललित मोदीची मदत केली नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ललितगेट' आणि 'व्यापमं' घोटाळ्यामुळे काहीच काम होऊ शकलेले नाही. संसदेच्या लॉगजॅमचा तिढा लवकर सुटण्याची कोणतीही चिन्हे सर्वपक्षीय बैठकीनंतही दिसत नाहीत. सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राण्यास काँग्रेस राजी झाली, मात्र ललितगेट आणि व्यापममध्ये अडकलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय संसदेचे कामकाज चालू देणार नसल्याचा पवित्रा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला आहे. दरम्यान, राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ पर्यंत आणि नंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी दोन पर्यंत स्थगित करण्यात आले. दुपारी दोनवाजता कामकाज सुरु झाल्यानंतर पुन्हा गोंधळ सुरु झाला. विरोधकांनी सभागृहात पोस्टर झळकवले त्यामुळे नाराज झालेल्या लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या 27 गोंधळी खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले.
पंतप्रधानांचे कामाकडे लक्ष नाही - सोनिया गांधी
सर्वपक्षीय बैठकीआधी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक झाली, त्यात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कामाकडे लक्ष नसल्याचे सांगत निशाणा साधला आहे. तर, संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी संसदेच्या लॉगजॅमचा तिढा सोडवण्यासाठी पंतप्रधान दखल देऊ शकतात असे म्हटले आहे.
मी ललित मोदीची बाजू ब्रिटीश कॉन्सिलमध्ये मांडली नाही - सुषमा स्वराज
दरम्यान, आज राज्यसभेत सुषमा स्वराज यांनी सभागृहाचे कामकाज सुरु झाल्याबरोबर चर्चेला तयार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, आज तरी चचर्चा होईल या आशेने दोन आठवड्यांपासून मी रोज सभागृहात हजर आहे. मात्र विरोधकांना फक्त गोंधळच घालायचा असे दिसत आहे. आपण ललितगेटवर चर्चा करायला तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ललित मोदीच्या बाजूने मी ब्रिटीश कॉन्सिलला काहीही सांगितलेले नसल्याचे त्या म्हणाल्या. मात्र विरोधकांनी स्वराज यांच्या राजीनाम्याचे फलक झळकावले आणि सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत गदारोळ केला. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित करण्यात आले.
पुढील स्लाइडमध्ये, पंतप्रधान चतूर सेल्समॅन