आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंनिसच्या आंदोलनांची केंद्राकडून दखल नाही, कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येला साडेतीन वर्षे झाली. मारेकरी पकडले जावे म्हणून गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सहा वेळा जंतरमंतरवर  धरणे दिले, परंतु केंद्र सरकारने जराही दखल घेतली नाही, असा अाराेप समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला. 

डाॅ. दाभाेलकर, काॅम्रेड गाेविंद पानसरे अाणि डाॅ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना केंद्र सरकारने अटक करावी या मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जंतरमंतरवर एक दिवसाचे धरणे दिले. त्यात विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. पाटील म्हणाले, इंटरपाेलच्या रेड काॅर्नर नाेटिशीनुसार  सनातन साधक  सारंग अकाेलकर, प्रवीण निंबकर, रुद्र पाटील अाणि जयप्रकाश हेगडे हे २००९ पासून फरार अाहेत. डाॅ. दाभाेलकरांच्या हत्येचा त्यांच्यावर संशय अाहे.  त्यांचे फाेटाे सर्वच पाेलिस स्टेशनमध्ये लावून महाराष्ट्र सरकारने या गुन्हेगारांवर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करावे.
 
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी दहा वेळा पत्रव्यवहार केला, परंतु पत्राचे साधे उत्तरही त्यांनी दिले नाही अाणि भेटीसाठी वेळही दिला जात नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांनाही भेटीसाठी वेळ मागितली, परंतु दिल्लीत काेणीही आमच्या मागण्यांची दखल घेत नाहीत, असा आरोपही अविनाश पाटील यांनी या वेळी केला.   
 
महाराष्ट्रभर करणार धरणे आंदोलन
समितीचे सचिव माधव बावगे, सुशीला मुंडे, मिलिंद देशमुख, प्रशांत पाेतदार, गजेंद्र सूरकर या प्रमुख कार्यकर्त्यांनी या वेळी गेल्या साडेेतीन वर्षांतील सरकारच्या कामाचा लेखाजाेखा मांडला. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात धरणे अांदाेलन देऊन सरकारच्या अपयशाची माहिती लाेकांपर्यंत पाेहाेचविण्याचा निर्णय घेण्यात अाला, अशी माहिती या पदाधिकाऱ्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...