आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंग-केजरी वादावर मोदींचा निर्णय, सर्व अधिकारांत LG नाच ठरवले वरचढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उपराज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. केंद्राने अधिकारांसंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. दिल्लीमध्ये एलजी म्हणजे उपराज्यपाल हेच सरकारमधील प्रमुख असतील असे म्हटले आहे. नियुक्ती आणि बदल्यांचा अंतिम अधिकारही एलजीनाच असेल असेही यात म्हटले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर गृह मंत्रालयाच्या वतीने ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या वादावरून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यात गुरुवारी रात्री दोनवेळा चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या प्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

सिसोदियांचे ट्वीट...
ही अधिसूचना जारी होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एकापाठोपाठ एक काही ट्वीट केले होते. त्यावरून स्पष्ट होते की, केंद्राकडून अशा प्रकारची अधिसूचना जारी केली जाण्याची कुणकुण दिल्ली सरकारला आधीच लागली होती. एका ट्वीटमध्ये ते म्हणाले की, गृहमंत्रालयाच्या मदतीने काही भ्रष्ट अधिकारी दिल्लीत ट्रान्सफर पोस्टींगचे अधिकार एलजींनाच आहेत असा फतवा तयार करत आहे, असे समजते आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले, 'गृहमंत्रालय काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी घटनेच्या विरोधात निर्णय घेणार का?

दिल्लीत सुमारे तीन ते चार दिवसांपासून ट्रान्सफर -पोस्टिंगच्या मुद्यावरून जोरदार वाद सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल नजीब जंग दोघेही एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...