आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या बँकांचे ६ मोठ्या बँकांत विलीनीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार २७ सरकारी बँकांचे सहा मोठ्या बँकांत विलीनीकरण करण्याच्या तयारीत आहे. येत्या आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सहयोगी बँकांच्या विलीनीकरणातून या प्रक्रियेला सुरुवात होईल.

अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकार देशात ४ ते ६ मोठ्या बँका बनवणार आहे. सरकार आयडीबीआय बँकेतील ८० टक्के भागीदारी घटवून ६० टक्क्यांपर्यंत आणण्याची शक्यता आहे. सिंडिकेट बँक, इंडियन ओव्हरसीस बँक आणि युको बँकेचे विलीनीकरण कॅनरा बँकेत होईल, तर सेंट्रल बँक, देना बँकेचे विलीनीकरण युनियन बँकेत होईल. काही दिवसांपूर्वी कॅबिनेटने एसबीआयमध्ये सहयोगी बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी मंजुरी दिली होती. सूत्रांच्या मते एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया या देशातील मोठ्या बँका आहेत. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात सरकारी बँकांच्या एकत्रीकरणाचा आराखडा तयार करणार असल्याची घोषणा केली होती.
बातम्या आणखी आहेत...