आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Centre Moves SC For Staying Release Of Rajiv Gandhi Assassins

राजीव यांच्या मारेकर्‍यांच्या सुटकेला कोर्टाची स्थगिती; जयललितांना ‘निर्णयघाई’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सात मारेकर्‍यांची सुटका करण्याचा निर्णय घेताना तामिळनाडू सरकारने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला नसल्याचे नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने या सुटकेला स्थगिती दिली. न्यायालयाने राज्य सरकारचे म्हणणे मागवले असून पुढील सुनावणी 6 मार्चला होत आहे.
या स्थगितीमुळे राजीव हत्येतील दोषी मुरुगन, संथन आणि पेरारिवलन यांची आता सुटका होऊ शकणार नाही. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या तिघांची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप सुनावली होती. बुधवारी यावर घटनात्मक अधिकारांचा वापर करून तमिळनाडू सरकारने या हत्येतील सर्व सात दोषींची मुक्तता करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, यावर आता नरेंद्र मोदी शांत का आहेत, असा प्रश्न कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला.
कोर्टाचा राज्याला सवाल
फाशी रद्द केल्याच्या दुसर्‍याच दिवशी तामिळनाडू सरकारने कायदेशीर प्रक्रिया कशी पूर्ण केली, असा प्रश्न न्यायपीठाचे न्यायमूर्ती रंजन गोगोई व न्या. एन. व्ही. रमण्णा यांनी उपस्थित केला. फाशी माफ करणे याचा अर्थ दोषींना तत्काळ मुक्त करावे असा नव्हे, अशी टिप्पणी न्यायपीठाने केली. दरम्यान, केंद्र सरकारने तिन्ही दोषींची फाशी रद्द करण्याच्या निकालास आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, उर्वरित चौघांचीही सुटका अशक्य